आपला जिल्हाशिक्षण संस्कृती

HSC, SSC बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

परीक्षा केंद्र परिसरात 200 मीटर पर्यंत मनाई आदेश लागू

लोकगर्जनान्यूज

बीड : माध्यमिक व उच्च माध्यमिक HSC , SSC परीक्षा माहे फेब्रुवारी, मार्च, 2024 मध्ये होत असून परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दिपा मूधोळ-मुंढे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात ( दि. 21 ) फेब्रुवारी, 2024 ते ( दि.26 ) मार्च, 2024 या कालावधीत परिक्षेच्या वेळेच्या 1 तास आगोदर ते परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरात व परिक्षेचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी मनाई आदेश जारी केले आहे.
HSC , SSC परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी परिक्षा चालू असतांना परीक्ष न देणारे विद्यार्थी आणि इतर काही घटक परिक्षा केद्राच्या परिसरात परिक्षा चालू असतांना उपद्रव करित असतात. परिक्षा चालू असतांना कॉपी देण्याचा प्रयत्न करतात तसेच परिसरातील झेराक्स सेंटरचा कॉपी पुरविण्यासाठी दूरूपयोग होण्याची शक्यता लक्षात घेता परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांना व परिक्षेसाठी नियुक्त अधिकारी ,कर्मचारी यांना बाहेरील व्यक्तींचा त्रास होऊ नये इयत्ता 12 व 10 HSC , SSC परिक्षा केंद्राच्या ठिकाणी व परिक्षा केंद्राच्या 200 मिटर परिसरात फौज्दारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) करण्यात आले आहे.
या परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी केला असून परीक्षा केंद्राच्या परिसरात 200 मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्ये पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी यांच्या व्यवतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास, फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण, संदेश वहन साधने तसेच कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेस सेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, संगणक बाळगण्यास, एस.टी.डी,आय.एस.डी मशिन, ध्वनीक्षेपक वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
शासकीय परिक्षेसंबधीत कर्मचाऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या वाहना व्यतिरीक्त इतर अनाधिकृत वाहनांना परिक्षा केंद्राच्या 200 मिटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, मयताची अंत्ययात्रासाठी लागु राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »