आपला जिल्हा

लोकसहभागातुन सुरू होतोय बीडमध्ये हॉस्पीटल

 

उद्या अंजुमन हिदायतुल इस्लाम हॉस्पीटलचे उद्घाटन

बीड : गोरगरीब आणि गरजु रूग्णांसाठी अतिशय कमी दरात तपासणी आणि उपचार मिळावेत या दृष्टीने कमिटीने अंजुमन हिदायतुल इस्लाम हॉस्पीटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या रविवारी ( दि.२६ ) दु.२ वाजता या हॉस्पीटलचे उद्घाटन होणार आहे. हा अकरा जणांच्या समितीने लोकसहभागातुन सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.

शहरातील गायकवाड हॉस्पीटलसमोर बागवान गल्ली, शाहुनगर, पांगरी रोड बीड येथे अंजुमन हिदायतुल इस्लाम हॉस्पीटलचे सुरू होत आहे. याठिकाणी तपासणी फिस व औषधे फक्त ३० रूपयांमध्ये दिली जाणार आहेत. तसेच प्रेग्नसी टेस्ट ५० रू. एक इंजेक्शन ३०/- रू. एक सलाईन १००/- रू. आणि रक्ताच्या तपासणीसाठी ५०% सुट दिली जाणार आहे. दररोज सकाळी १० ते दु. ३ पर्यंत रूग्णसेवा दिली जाणार आहे. येथे प्रत्येक समाजातील, घटकातील रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.

कमिटीमध्ये या 11 जणांचा समावेश

अंजुमन हिदायतुल इस्लाम हॉस्पीटल कमिटीमध्ये शाहेद पटेल, हाफीज सलाउद्दीन, मौलाना शफीक, हाफीज शमशोद्दीन, काझी शफीक साहब, शेख रईस, बबु मेंबर, बाबा पठाण, कलीम भाई, अर्शद खान, एहतशाम बागवान यांचा समावेश आहे. जमियत-उलेमा-ए-हिंदच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कमिटीने यामध्ये सर्वांना सहभागी करून घेतले आहे. प्रत्येक भागातील एका व्यक्तीचा समावेश करण्यात आलेला आहे. हॉस्पीटलमध्ये महिला डॉक्टरसह अन्य एक असे दोन डॉक्टर व 5 कर्मचार्‍यांचा स्टाफ असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »