शिक्षण संस्कृती

दहावी,बारावी ( SSC-HSC EXAM) परीक्षेसंदर्भात घेतले म्हत्वाचे निर्णय

बैठे पथकासह कृती कार्यक्रम, व्हिडिओ शुटिंग

लोकगर्जनान्यूज

पुणे : इयत्ता दहावी, बारावी ( SSC-HSC EXAM) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पुढील फेब्रुवारी व मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत. या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये व हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी अनेक म्हत्वाचे निर्णय घेतले आहे. यावेळी बैठे व भरारी पथके असणार आहेत तसेच कृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी पालकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. तर झूम कॉलच्या माध्यमातून पुर्ण तीन तासांचे व्हिडिओ शुटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे.

यावर्षी १०,१२ ( SSC-HSC EXAM) राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळा मार्फत परीक्षा पार पडणार आहेत. यावेळी इयत्ता १० ( SSC ) चे १७ लाख विद्यार्थी तर १२ ( HSC ) १५ लाख विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. यासाठी अंतिम वेळापत्रक परीक्षा मंडळाने जाहीर केला. १० ( SSC ) परीक्षा २ मार्च ते २५ मार्च तर १२ ( HSC ) परीक्षा फेब्रुवारी २१ पासून सुरू होऊन २१ मार्च पर्यंत चालतील. या परीक्षा सुरळीत व अनुचित प्रकाराविना पार पडावी यासाठी परीक्षा मंडळाने तयारी सुरू केली आहे.‌ मागील प्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रावर कायम बैठे पथक रहाणार आहे. तसेच भरारी पथकेही परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. तसेच यावर्षी कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी पालकांकडून ऑनलाईन पद्धतीने सूचना मागविण्यात आल्या असून २० जानेवारी शेवटची तारीख निश्चित केली.
परीक्षा केंद्रावर होणार व्हिडिओ शुटिंग
राज्यात एकूण ९ हजार परीक्षा केंद्र आहेत. या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही ( CCTV Camera ) बसवणं शक्य नाही. यामुळे आधुनिक साधनांचा उपयोग करत परीक्षकांच्या मोबाईल वरुन झूम ॲप द्वारे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तीन तासांचे अथवा उत्तर पत्रिका देण्यापासून ते संकलन करेपर्यंत व्हिडिओ शुटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »