आपला जिल्हाराजकारण

लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी 44 उमेदवारी अर्ज दाखल

सहाव्या दिवशी बुधवारी 29 उमेदवारी अर्ज दाखल

लोकगर्जनान्यूज

बीड : 39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बुधवारी ( दि. 24 ) सहाव्या दिवशी 29 नामनिर्देशन अर्ज दाखल झाली असून आजपर्यंत एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत.
यामध्ये महायुती, इंडिया आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

१८ तारखेपासून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले. यामध्ये २२ तारखेला इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर बुधवारी ( दि. २४ ) महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रमुख उमेदवारांसह 39 बीड लोकसभा मतदारसंघातून बुधवारी ( दि. 24 ) 29 उमेदवारीअर्ज दाखल केले आहेत. यामध्ये कोळेकर गणेश भाऊसाहेब (अपक्ष), करूणा मुंडे(स्वराज्य शक्ती सेना), हिदायत सादेख अली सय्यद (अपक्ष),अंबादास जाधव (अपक्ष), सादेक हुसेन महम्मद (अपक्ष), संतोष उत्त्म रासवे (अपक्ष), सलाउद्दीन खान पठाण (अपक्ष),गणेश व्यंकटराव कस्पटे (अपक्ष), सादेक इब्राहीम शेख (अपक्ष), अशोक सुखदेव हिंगे (वंचित बहुजन आघाडी), पंकजा गोपीनाथराव मुंडे (भारतीय जनता पक्ष) यांनी चार अर्ज दाखल केले, प्रितम गोपीनाथराव मुंडे (भारतीय जनता पक्ष) यांनी दोन अर्ज दाखल केले, श्रीराम विठ्ठलराव खळगे (अपक्ष), मुस्तफा मैनोदीन शेख(अपक्ष), सुलेमान खैरोद्दीन महमद (अपक्ष),भिमराव जगन्नाथ दळे (अपक्ष),रहेमान बाहोद्दीन सय्यद (अपक्ष), राजेंद्र अच्युतराव होके(अपक्ष), जावेद सिकंदर मोमीन (अपक्ष), लक्ष्मीबाई बाजीराव मोरे (अपक्ष), रविकांत अंबादास राठोड (अपक्ष), देविदास यशवंत शिंदे (अपक्ष), पठाण अमजद जिलानी (अपक्ष), पठाण सरफराज बाबखाँ(अपक्ष), जावेद सलीम सय्यद (टिपू सुलतान पार्टी)
असे एकूण 29 नामनिर्देशन अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समक्ष सादर केले आहेत.
आज पर्यंत एकूण 117 इच्छुक उमेदवारांना 262 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »