आपला जिल्हा

केज तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था, गुडघाभर खड्ड्यामुळे प्रवाशांना मरणयातना

शेकडो निवेदनं,आंदोलनाला केराची टोपली

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील ग्रामीण रस्ते प्रवास करण्यायोग्य राहिलेले नाहीत . या रस्त्याचे कोणालाही देणे-घेणे दिसत नाही. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही यावर निधी उपलब्ध नाही,मंजुरी नाही अशी कारणे पुढे करून ही रस्ते वर्षानुवर्षे तशीच आहेत तर अनेक रस्त्यावरचा मंजूर निधी नेमका कुठे जातो याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत.कुठे थातुरमातुर खडी टाकून बिल उचलण्याचे उद्योग केले जात आहेत . गुडघाभर खड्डे पडलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित बनवावेत अन्यथा पावसाळ्यात पांदण रस्ते बनतील प्रवास करतानाच्या मरण यातना कधी कमी होणार हाच प्रश्न उभा आहे.

रस्ते बघायचेत या रस्त्याने एकदा प्रवास करून बघाच
▪️आडस ते कळंबआंबा
▪️आडस ते उंदरी, पिसेगाव
▪️आडस ते सोनवळा
▪️मानेवाडी ते केकतसारणी, चंदनसावरगाव
●सारणी ते आनंदगाव
●चंदनसावरगाव ते जवळबन
● सावळेश्वर ते जवळबन
● सावळेश्वर ते आवसगाव
● सोनीजवळा ते आनंदगाव
●कुंबेफळफाटा ते येडेश्वरी कारखाना धनेगाव फाटा
●धनेगाव फाटा ते धनेगाव
●सौन्दना ते बनसारोळा
● उंदरी ते चंदनसावरगाव ते केज
●सौन्दना ते आवसगाव
●युसूफवडगाव ते बावची
●चंदनसावरगाव ते केकतसारणी
आनंदगाव ते भाटुंबा आनंदगाव ते जवळबन

यांच्यासह ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते दूर अवस्थेमध्ये आहेत याकडे लक्ष घालून ते रस्ते व्यवस्थित करावेत अशी मागणी केली जात आहे.

वरील बहुतांश रस्त्यांवर जाताना केवळ दगड आणि गुडघाभर खड्डे पडलेले आहेत कुठेही डांबराचा पत्ता नाही. परिसरातील वाहतूक करताना अडथळा निर्माण होत आहे अनेकांना मणक्याचे आजार झाले आहेत. रुग्णांना दवाखान्यात नेत असताना ही रुग्णांचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही या रस्त्याचा प्रश्न मिटणार कधी ?हाच प्रश्न उभा आहे.

थातूर मातूर दुरुस्त्या ही बंद

मागील तीन वर्षापूर्वी अनेक रस्त्यांबाबत टेंडर निघून थातूर मातूर डांबर टाकले जायचे मात्र आता रस्ते पूर्ण उखडून गेले तरी ना कुठे डांबर टाकले जात आहे नवीन रस्ता होत आहे मुख्यमंत्री ग्रामसडक असो अथवा अन्य योजनेतून निधी उपलब्ध करून हे रस्ते होणे अत्यंत गरजेचे आहे.

सहा महिन्यापासून रस्ता उखडून ठेवला

कारखाना फाटा ते आनंदगाव
हा रस्ता कंत्राटदाराने गेल्या सहा महिन्यापासून उखडून ठेवला असल्याने अनेक अपघात झाले आहेत पुढे त्याचे काम का झाले नाही याचे कारणही कळत नाही तात्काळ रस्ता पूर्ण करायला हवा

नायगाव ते इस्थळ साळेगाव ते मांगवडगाव झालेले रस्ते निकृष्ट कामामुळे त्यांची दुरावस्था झालेली आहे.

पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे न झाल्यास गावकरी उपोषणाला बसणार

पावसाळ्यापूर्वी आमच्या गावचे खराब झालेले रस्ते तात्काळ न झाल्यास आम्ही सर्व गावकरी मिळून शासनाविरोधात उपोषणाला बसणार आहोत.

गावकरी आनंदगाव

तात्काळ रस्ते दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन

तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते तात्काळ करण्यात यावेत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड चे राहुल खोडसे , छावा चे शिवाजी ठोंबरे,सामाजिक कार्यकर्ते ऍड सुधिर चौधरी,दत्ता शिनगारे यांनी दिला आहे.

सहा महिन्यात दोनदा टायर बदली

रस्ते खराब होऊन गुडघाभर खड्डे पडलेले असल्यामुळे आमच्या वाहनाचे सतत टायर बदली करावी लागत आहेत व मशनरीचे काम निघत आहे तर दणके बसल्याने मणक्याचे त्रास प्रवाशांना वाढत आहेत.

रिक्षा चालक जवळबन

रस्त्यातच महिला बाळंतीन

आनंदगाव ते केज प्रवासादरम्यान गुडघाबर खड्ड्यामुळे रिक्षातच महिला बाळंतीन होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तर रुग्ण दवाखान्यात घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची घटना घडलेल्या आहेत.

ग्रामीण भागातील रस्ते तात्काळ करून नागरिकांच्या मरणयातना थांबवाव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »