नीट ( NEET 2024 ) फॉर्म भरण्याची इतकीच वेळ शिल्लक?
लोकगर्जनान्यूज
बीड : नीट परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आज दिनांक 9 व उद्या 10 एप्रिल पर्यंत संधी आहे. इच्छुक आज पासून 10 एप्रिल च्या रात्री 11:50 पर्यंत फॉर्म भरू शकतात.
यापूर्वी नीट साठी 09 फेब्रुवारी 2024 च्या सार्वजनिक सूचनेनुसार, NEET (UG)-2024 साठी नोंदणी विंडो 09 फेब्रुवारी ते 09 मार्च 2024 पर्यंत उघडण्यात आली होती. त्यानंतर, दिनांक 09 च्या सार्वजनिक सूचनेनुसार ती 16 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र फॉर्म भरण्याकरिता ऑनलाइनसह इतर अडचणींमुळे उमेदवारांकडून NEET (UG) 2024 ची नोंदणी विंडो पुन्हा उघडण्यासाठी विनंती करण्यात आली. या मागणीला अनुसरून NEET (UG)- 2024 ची नोंदणी विंडो पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार परीक्षा/सत्र राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा (NEET (UG) – 2024 ऑनलाइन अर्जाच्या सुधारित तारखात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. वाढविण्यात आलेल्या तारखेनुसार आता ऑनलाइन शुल्क प्राप्त करण्याची शेवटची तारीख 09 ते 10 एप्रिल 2024 (रात्री 10:50 पर्यंत), 10 एप्रिल 2024 (रात्री 11:50 पर्यंत) वाढविण्यात आली आहे. NEET(UG) (मुख्य) पोर्टलवर परीक्षेच्या शहराची आगाऊ माहिती, प्रवेशपत्र डाउनलोड करणे आणि निकाल जाहीर करण्याच्या तारखा योग्य वेळी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. फॉर्म भरून लॉगिन करण्यासाठी उमेदवाराला आधार कार्ड, डिजी लॉकर, ABC आयडी, पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड, शाळा/इतर कोणतीही वैध सरकारी छायाचित्रासह ओळखपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, फॉर्म भरण्यासाठी ही एकच संधी आहे म्हणून काळजीपूर्वक माहिती भरने आवश्यक आहे. फॉर्म भरण्यात खूप झाल्यास NEET (UG) 2024 साठी अर्ज करण्याची दुसरी संधी दिली जाणार नाही. यामुळे ऑनलाइन अर्ज भरताना बिनचूक भरणे आवश्यक आहे. उमेदवाराला प्रक्रियेत अद्याप काही अडचण येत असल्यास ते 011-40759000 वर संपर्क साधू शकतात किंवा neet@nta.ac.in वर ईमेल लिहू शकतात. अशी माहिती नीट च्या वरिष्ठ संचालिका डॉ. साधना पराशर यांनी काढलेल्या पत्रातून दिली असून प्रवेश पूर्व अर्ज तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी 05 मे 2024 रोजी दुपारी 02:00 ते 05:20 पर्यंत देशभरातील सुमारे 571 शहरांमध्ये आणि भारताबाहेरील 14 शहरांमध्ये राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा [(NEET (UG)]-2024 आयोजित करण्यात येणार आहे.