क्राईम

अंबाजोगाई तालुक्यात खळबळ! कोळकानडी येथे विहीरीत अनोळखी मृतदेह आढळला

लोकगर्जनान्युज

अंबाजोगाई : तालुक्यातील कोळकानडी येथे विहीरीत ३५ ते ४० वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले. हा प्रकार नेमका घातपाताचा की, आत्महत्या अशी चर्चा सुरू आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, अंबाजोगाई तालुक्यातील कोळकानडी येथील शेतकरी केरबा शंकर कदम यांच्या शेतात गट क्र. १८९ मधील विहिरीत दि. ४ सकाळी पावणे अकराच्या सुमारास पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सदरील इसम अनोळखी असून, ओळख पटावी असे त्याकडे काही सापडले नाही. यामुळे पोलीसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. ओळख पटल्यानंतर हा प्रकार नेमका घातपाताचा आहे की, आत्महत्या हे उघड होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »