राजकारण

स्वप्नातील गाव साकार करण्यासाठी उद्या म्हत्वाचा दिवस

बीड जिल्ह्यातील १८४ ग्रामपंचायतीचे कारभारी निवडण्यासाठी रविवारी मतदान

लोकगर्जनान्यूज

बीड : प्रत्येकाच्या स्वप्नातील एक गाव असत पण ते सर्वांचेच साकार होत नाहीत. तशी केवळ पाटोदा, हिवरे बाजार अशी काही बोटावर मोजता येतील इतकेच असतात. परंतु स्वप्नातील गाव साकार करण्यासाठी तसे कारभारी निवडण्याची संधी प्रत्येक ५ वर्षाला एकदा मिळते. ही संधी बीड जिल्ह्यातील १८४ ग्रामपंचायतीच्या जनतेला प्राप्त झाली. उद्या रविवारी ( दि. ५ ) या ग्रामपंचायतीचे कारभारी निवडण्यासाठी मतदान होणार आहे. आपल्या स्वप्नातील गाव साकार करण्यासाठी म्हत्वाची संधी असून या संधीच सोनं कोण करतो? हे पुढील ५ वर्षात दिसून येणार आहे.

भारत देश हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाच्या विकासासाठी खेड्यांचा विकास होणे आवश्यक असून खेडे विकसित झाले की, भारत विकसनशील झाला हे सांगण्यासाठी कोण्या विद्वानांची गरज नाही. गावाच्या म्हणजेच खेड्यांच्या विकासात ग्रामपंचायतीची म्हत्वाची भूमिका आहे. यामुळे शासनाने बराच निधी आता सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यावर टाकण्यास सुरुवात केली. याचा अनेक गावांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. शुद्ध पाण्यासाठी आरओ फिल्टर, चांगले रस्ते, नाल्या, स्वच्छता, दिवाबत्ती यामुळे खेड्यातील माणसाचे जीवन काहीसे सुखरूप दिसते. पण याही परिस्थितीत अनेक गावं विकासापासून दूर दिसत असून, त्यांचं घाणेरडे रुप बदलण्यास तयार नाही. अनेक गावांत आजही पाणी मिळत नाही, रस्ते नाहीत की, दिवाबत्ती नाही. स्वच्छता गावात असते? करावी लागते? याची कदाचित त्यांना माहीतच नाही असे काही गावे पाहिली की, दिसून येते. मग या गावांना निधी येत नाही का? उत्तर आहे शंभर टक्के येतो. हे भांडून उलट जास्त आणतात? मग गाव बकाळ कसे? तर हा आणलेला निधी खर्च होतो परंतु ते झालेलं काम पहिल्या पावसात नदीला जाऊन मिळतो. अन् यामुळे गावाची पडझड होऊन तो बकाळ रहातो. परंतु अशा पडझड होत असलेल्या प्रत्येक गावात एक ठिकाण असं असतं जिथे इमले चढत असतात. संगेमरमर, अन् सागवान लाकड लावून त्याला हायटेक रुप देण्यात येतो. गावातील पुर्ण झाले की, मग तालुक्यावर बांधकाम सुरू होतं? गाव मागे पडत जातो. परंतु हे चित्र बदलण्यासाठी देशाचं संविधान प्रत्येक गावकऱ्याला पाच वर्षांत एक संधी देतो अन् ती संधी आहे मतदानाची. उद्या रविवारी ( दि. ५ ) राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच १३० सरपंच आणि २ हजार ९५० सदस्यांच्या पोटनिवडणूक मतदान होणार आहे. बीड जिल्ह्यातसार्वत्रिक व पोटनिवडणूक असे एकूण १८४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असून उद्या रविवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होणार आहे. यामुळे आपल्या स्वप्नातील गाव साकार करण्यासाठी मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता तसेच जातपात, धर्म, गरीब, श्रीमंत न पहाता गावाच्या विकासासाठी चांगल्या उमेदवारांना मतदान करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »