राजकारण

ग्रामपंचायत सदस्यांचा थकित मासिक भत्ता द्यावा – आमदार नमिता मुंदडा

 

ग्रा.पं सदस्य शिवरुद्र आकुसकर यांच्या मागणीची केजच्या आमदारांकडून दखल

लोकगर्जना न्यूज

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांना प्रत्येक मासिक बैठकीसाठी देण्यात येणारा भत्ता सन २०१८ पासून देण्यात आला नाही. याबाबतीत पाठपुरावा करुन हा भत्ता मिळवून द्यावा अशी मागणी आडस ग्रामपंचायत सदस्य शिवरुद्र आकुसकर यांनी आमदार नमिता मुंदडा यांना निवेदनाद्वारे मागणी केली. याची तात्काळ दखल घेऊन आमदार मुंदडा यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहून केज, अंबाजोगाई सह जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांना थकित मासिक भत्ता देण्याची मागणी केली.

केज मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी ग्रामपंचायत सदस्य मासिक भत्ता प्रश्नी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, शासनाने सन २०० ९ च्या निर्णय मध्ये सुधारणा करून ०६ सप्टेंबर २०१४ च्या शासन निर्णया नुसार ग्रामपंचायत सदस्य यांना प्रत्येक मासिक बैठकी साठी २०० रू भत्ता देण्याचा निर्णय घेतला . गेली चार वर्ष झाले बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांना भत्ता मिळालेले नाही . एका सदस्याला पाच वर्षात ६० बैठकासाठी १२००० / – रू मिळणे आवश्यक आहे . केज मतदारसंघ तसेच बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुका या नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या आहेत . या ग्रामपंचायतीचा कालावधी संपण्यासाठी फक्त १० महिने बाकी आहेत . विद्यमान सदस्य निवडून येऊन चार वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. अजून त्यांना भत्ता मिळालेले नाही . माझ्या मतदार संघात केज तालुक्यात ११४ ग्रामपंचायत असून यामध्ये १०५६ ग्रामपंचायत सदस्य आहेत . अंबाजोगाई तालुक्यात ९९ ग्रामपंचायत आहेत यात जाळापास ९ ०० ग्रामपंचायत सदस्य आहेत . तसेच बीड जिल्ह्यात जवळपास १०३० ग्रामपंचायत आहेत यात ९ ३०० ग्रामपंचायत सदस्य आहेत . यातील बहुतांश ग्रामपंचायत सदस्य यांना भत्ता मिळालेले नाही . त्याच प्रमाणे सरपंच आणि उपसरपंच यांना ७५ % मानधन हे शासन देते तर २५ % मानधन हे ग्रामपंचायत स्थरावर देणे आवश्यक आहे परंतु हे मानधन देखील बहुतांश सरपंच आणि उपसरपंच यांना मिळालेले नाही . सदर मानधन मिळण्याबाबत मोठ्याप्रमाणात मागणी होत आहे . ग्रामपंचायत सदस्य यांना दिले जाणारे मानधन हे अत्यंत कमी असताना देखील त्यांना ते अद्याप मिळालेले नाही . त्यामुळे बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य यांचे मानधन देण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना त्यांच्या हक्काचं भत्ता मिळेल अशी आशा व्यक्त केली जात असून आमदार नमिता मुंदडा यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »