राजकारण

खा. रजनीताई पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

स्वच्छता अभियान, निबंध स्पर्धा ,विद्यार्थ्यांना फळे वाटप

केज : राज्यसभेच्या खासदार काँग्रेसच्या नेत्या
केज ,माऊली विद्यापीठाच्या संस्थापक खा रजनीताई अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली विद्यापीठ अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयात , , विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, खाऊ वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रताप मोरे नियोजनातून विविध उपक्रम घेण्यात आले.

प्राथमिक माध्यमिक विद्यालय उमरी येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. रामराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वाचन उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना पुस्तके संच भेट देऊन पुस्तक पेढी सुरू करण्यात आली .सरस्वती कन्या प्रशाळेत निबंध स्पर्धा, व फळे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात स्वच्छता मोहीम व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप. महिला कला महाविद्यालय मार्फत जिव्हाळा निवारा केंद्र येथे आश्रित व वृद्ध नागरिकांना किराणा साहित्य भेट. माऊली प्राथमिक विद्यालय बीड निबंध स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमिला देवी पाटील कला महाविद्यालया च्या वतीने कळसंबर येथील अनाथ आश्रमात फळे वाटप करण्यात आले

केज येथील आदर्श प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक धनराज सोनवणे, डॉ हनुमंत सौदागर , प्राचार्य विजय शिनगारे,मुख्याध्यापिका सविता घुले,मुख्याध्यापक श्री खोसे, मुख्याध्यापक राम कांबळे,सहशिक्षक विलास भिसे ,मुख्याध्यापक संदीप सत्वधर आदींच्या नियोजनातून उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »