क्राईम

केजमध्ये टमटमचा अपघात एक ठार एक जखमी

लोकगर्जनान्यूज

केज : चिंचोलीमाळी वरुन केज येथे आलेला रिक्षा अचानक पलटी होऊन घडलेल्या अपघातात एक महिला ठार तर एक जखमी झाल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर कळंब रोडवर आज शनिवारी तासभरापुर्वी घडली आहे.

कमल मिठु शिंदे ( वय ६० वर्ष ) रा. परळी असे मयत महिलेचे नाव आहे. कमल या बहीणीच्या पतीचे निधन झाल्याने सावडण्यासाठी चिंचोलीमाळी ( ता. केज ) येथे आल्या होत्या. सावडणे झाल्याने त्या परळी येथे जाण्यासाठी चिंचोलीमाळी येथून एका टमटममध्ये बसून केजपर्यंत येत होत्या. हा टमटम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर आला असता अचानक पलटी झाला. टमटम पलटी होताच कमल शिंदे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यांच्यासह एक महिला जखमी असून त्यांचे नाव मात्र समजु शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »