क्राईम
अंबाजोगाई-लातूर महामार्गावर अपघात; दुचाकीस्वार ठार
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : दुचाकी आणि एसटीची धडक होऊन घडलेल्या अपघातात येथील तरुण ठार झाल्याची घटना बुधवारी ( दि.२४ ) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सायगाव जवळ घडली आहे.
शेख खलील दादामिया रा. पेन्शनपुरा ( अंबाजोगाई ) असे अपघातातील मयत तरुणाचे नाव आहे. बुधवारी रात्री ११ वाजता अंबाजोगाई-लातूर महामार्गावर सायगाव जवळ दुचाकी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीची धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार शेख खलील या तरुणाचा मृत्यू झाला. मयत हा शहरातील विट उद्योजक शेख दादामिया यांचा मुलगा होता. या घटनेने पेन्शनपुरा भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.