Online game- ऑनलाईन गेमचा चटका दिड लाखाला फटका; पुन्हा रचला असा बनाव
लोकगर्जनान्यूज
बीड : तालुक्यातील एका तरुणाने दिड लाख रुपये चोरी झाल्याची पोलिसांमध्ये तक्रार केली. याची दखल घेऊन स्था.गु.शाखा ( Lcb ) ने सुरू केला. परंतु त्यांना फिर्यादी काही तरी लपवित असल्याचा संशय आल्याने उल्ट तपासणी केली असता फिर्यादीने मीच दिड लाख रुपये ऑनलाईन गेम ( online game ) मध्ये हरलो असून घरी काय सांगावे? म्हणून चोरीचा बनाव रचल्याचे सांगितले असून एलसीबीने हा बनावट चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.
सोमवारी ( दि. 7 ) बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिड लाख रुपये चोरीची फिर्याद आलीकी, काळेगाव ( ता. बीड ) येथील नवनाथ संगम धुमाळ या ३० वर्षीय तरुणाने मी वडवणी येथे दिड लाख रुपये घेऊन बँकेत भरण्यासाठी जात होतो. तेंव्हा पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने माझ्या दुचाकीला धडक देऊन माझ्या जवळील दिड लाख रूपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून घेऊन गेले.भर दिवसा इतकी मोठी रक्कम चोरीला जाणे म्हणजे ही खूप गंभीर घटना आहे. याची दखल घेत स्था.गु. शा. ( Lcb ) यांनी तातडीने तपास सुरू केला. या दरम्यान त्यांना काहीच क्लू मिळत नव्हता. पण फिर्यादी नवनाथ हाच काही तरी आपल्यापासून लपवित असल्याचा संशय आल्याने त्याची उलट तपासणी केली. यावेळी फिर्यादीने मीच ऑनलाईन गेम ( online game ) मध्ये पैसे हरलो आहे. इतकी मोठी रक्कम कुठं गेली विचारल्यावर घरी काय सांगावे? हा माझ्या समोर प्रश्न होता.यामुळे मी चोरीचा बनाव केल्याचे सांगितले आहे. Lcb च्या जागरुकते मुळे मोठ्या चोरीचा बनाव उघड झाला. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. Lcb ने केली. ऑनलाईन गेम ( online game ) हे सध्या मोठं व्यसन म्हणून पुढे येत असून अनेकजण यामध्ये लाखो रुपये घालवून देशोधडीला लागले आहेत. मागे एका मराठी वाहिनीने या ऑनलाइन गेम ( online game ) व्यसनामुळे तीन जणांनी महाराष्ट्रात मृत्यूला कवटाळले असल्याचे वृत्त दिले आहे. यामुळे सर्वांनी या पासून सावध व दूर रहाणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.