MPSC – इंजिनिअर निलेश लांडगे यांचा सत्कार
स्वयंआध्यनातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते - इंजि निलेश लांडगे
केज : अभ्यासातील सातत्य, रोज नऊ ते दहा तास अभ्यास, पायाभूत परिपूर्ण ज्ञान, संकल्पनाची स्पष्टता आणि स्पर्धा परीक्षेतील जुन्या प्रश्नपत्रिकांचा केलेला सराव यामुळे हे यश मिळाल्याचे निलेश लांडगे यांनी सांगितले. ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
महाराष्ट्र लोकसभा लोकसेवा आयोगामार्फत MPSC घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता वर्ग 2 या पदासाठी निलेश राजाभाऊ लांडगे यांची निवड झाली. त्याबद्दल भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय , भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालय व सरस्वती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निलेश लांडगे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. हनुमंत सौदागर तर प्राचार्य विजयकुमार शिंनगारे, प्रा. डॉ. रमेश माने, प्रा. डॉ. वैशाली आहेर,प्रा डॉ बुरगे,प्रा डॉ वाघमारे,प्रा डॉ चाटे, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
इंजि. लांडगे पुढे म्हणाले की, MPSC स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कमी वयात आपले ध्येय निश्चित केले आणि त्या दृष्टीने अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे अवघड नसल्याचे सांगितले. अध्यक्ष डॉ. सौदागर म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे ती सिद्ध केली पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. नागेश कराळे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.