भवताली

govt job – तरुणांनो तयारीला लागा जि.प. मध्ये शासनाकडून 19 हजार पद भरतीचे आदेश

लोकगर्जनान्यूज

बीड : मागील काही वर्षांपासून शासकीय पदभरती न झाल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. सुशिक्षित बेरोजगार शासन नोकर भरती कधी करणार याकडे डोळे लावून बसला आहे. आता ही प्रतीक्षा संपली असून, महाराष्ट्र ग्रामीण विकास विभागाने जि.प.मध्ये 18 हजार 939 पद भरतीचे आदेश काढले असून, ही भरती 15 ऑगस्ट 2023 पुर्वी करण्यात येणार आहे. त्यामुळे govt job – सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांनो तयारीला लागा असा सल्ला जेष्ठां कडून देण्यात येत आहे.

बदलत्या काळानुसार सरकारी नोकरी govt job ला मोठं महत्त्व प्राप्त झाले. नोकरी नाही म्हणून अनेक मुलांची लग्न होतं नाही. दुसरीकडे शासनही अनेक पदे रिक्त व सेवानिवृत्त होऊन अनेक पदे रिक्त झाली असतानाही शासन जागा भरत नाही. मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेत नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामे वेळेत पूर्ण होत नाही. दुसरीकडे बेकारी वाढली आहे. परंतु स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने 75 हजार पदे भरण्याचा निर्णय घेऊन घोषणा केली आहे. यापुर्वी जवळपास 20 हजार पद भरती घोषित केलेली आहे. आता आणखी राज्य सरकारने ग्रामीण विकास विभागाने ( दि. 12 ) एप्रिल 18 हजार 939 पदांच्या भरतीचा आदेश काढला आहे. यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना govt job सरकारी नोकरी मिळणार असल्याने हा निर्णय तरुणांसाठी दिलासादायक मानला जात आहे. सदरील पदभरती येत्या 15 ऑगस्ट 2023 च्या आधी होणार आहे. सरळसेवा भरती मध्ये दि. 16 मार्च 2023 शासन आदेशानुसार उमेदवारांना 2 वर्षांची वयोमर्यादा शिथिलता देण्यात आली. सदरील परिक्षा या TCS/IBPS या कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. जि.प. रिक्त पदांची बिंदुनामावली तयार झाली आहे. संबंधित कंपनी सोबत बैठक घेऊन MOU अंतिम करण्यात आला. Application portal विकसित करण्याचे काम IBPS कंपनी स्तरावर जोरदार सुरू आहे. अशा तऱ्हेने सर्व यंत्रणा या पदभरतीच्या तयारीला लागली असून, 15 ऑगस्ट म्हणजे तीन महिन्यांवर तारीख आली. त्यामुळे govt job करण्याची इच्छा असलेल्या तरुणांनीही या परीक्षेच्या तयारीला लागणे आवश्यक आहे.यामध्ये सरळ सेवा भरतीने कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक,सेविका, औषध निर्माता,कृषी, बांधकाम, पंचायत सर्वच विभागातील अनेक जि.प. स्तरावरील सर्व रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »