ASP पंकज कुमावत यांचा बीड शहरात पुन्हा पत्त्याच्या क्लबवर छापा
२४ जुगाऱ्यांसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकगर्जनान्यूज
बीड : सहाय्यक पोलीस अधीक्षक ( ASP ) पंकज कुमावत यांनी पथकासह शहरात भरवस्तीत सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा मारुन क्लब चालक व २४ जुगाऱ्यांना ताब्यात घेत २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
ASP पंकज कुमावत यांना गुप्त खबऱ्या मार्फत बीड शहरातील माळीवेस भागात एकजण स्वतः च्या घरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये पत्याचा क्लब चालवत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. माहिती मिळताच कुमावत यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय केजचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर राजू , बालाजी दराडे, सचिन अहकारे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रुक्मिणी पाचपिडे, आशा चौरे, पोलीस नाईक विकास चोपणे, अनिल मंदे, दिलीप गीते, महादेव बहीरवाळ, रामहरी भंडाने, संजय टूले, दीपक जावळे, शफिक पाशा, चालक सहाय्यक फौजदार शेषराव यादव, युवराज भूबे यांना सोबत घेऊन गुरुवारी ( दि. ९ ) १०:३० वाजण्याच्या सुमारास छापा मारला असता तेथे सनी आठवले हा स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना पैसे लावून हार-जीत झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळविताना आढळून आला. पोलीसांना पहाताच जुगाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी पाठलाग करत मोठ्या शिताफीने पकडले. एकूण २४ जुगारी व क्लब चालक सनी आठवले यास ताब्यात घेतले. यांच्याकडे रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच इतर असा एकूण २१ लाख ३५ हजार ९७० एवढा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वैभव अनिल सारंग यांचे फिर्यादी वरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच पंकज कुमावत यांच्या पथकाने शहरातील पत्याच्या क्लब वर छापा मारला होता. नंतर ही दुसरी कारवाई आहे. यामुळे पंकज कुमावत यांना जमत ते स्थानिक पोलिसांना का जमत नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.