महिला विश्व

बीड पोलीस दलाकडून महिला दिनी सविता आकुसकर यांचा सन्मान

लोकगर्जनान्यूज

केज : जागतिक महिला दिनानिमित्त बीड पोलीस दलाकडून जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये आडसच्या सविता आकुसकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला.

दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बीड पोलीस दलाकडून स्त्री शक्ती मंथन कार्यशाळा आयोजित केली. यावेळी जिल्हाभरातील कर्तृत्ववान ३० महिलांचा खा. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सत्कार करुन कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये आडस येथील सामाजिक कार्यकर्ती सविता आकुसकर यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला. याबद्दल सविता आकुसकर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सीईओ अजित पवार, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या सह आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »