ACB- कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला अन् उपजिल्हाधिकाऱ्यांचा घशात घास अडकला

लोकगर्जनान्यूज
बीड : वाळूचे टीप्पर सोडण्यासाठी 30 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत ( ACB ) पथकाने कारकूनाला रंगेहाथ पकल्याची आज बुधवारी ( दि. 24 ) दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव येथे कारवाई केली. यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयात जेवताना ही माहिती मिळाली अन् त्यांच्या घशात घास अडकला अशी अवस्था झाल्याने त्यांनी येथून काढता पाय घेतल्याची चर्चा आहे.
उपजिल्हाधिकारी कार्यालयात कारकून असलेल्या वैभव जाधव च्या विरोधात अनेक तक्रारी असल्याची चर्चा असून, आजही वाळूचा पकडलेला टीप्पर सोडण्यासाठी पत्र देण्यासाठी 30 हजारांच्या लाचेची मागणी केली. याबाबत संबधिताने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ( ACB ) तक्रार केली. त्या तक्रारीवरून बीड लाचलुचपत ( ACB ) ने सापळा लावून कारकून जाधव यास रंगेहाथ पकडले असल्याचे वृत्त आहे. यावेळी येथील उपविभागीय अधिकारी त्यांच्या कार्यालयात जेवण करत असताना ACB ची कारवाई होत असल्याचे माहिती मिळताच त्यांनी काढता पाय घेतल्याने घास घशात अडकल्याची चर्चा होत आहे.