शिक्षण संस्कृती
ग्रंथपाल संबंधी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय: शिक्षण मंत्री काय म्हणाले वाचा
लोकगर्जनान्यूज
बीड : राज्यात अनेक ग्रंथपाल अर्धवेळ असून, या बाबतीत महाराष्ट्र शासनाने ग्रंथपालांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली.
राज्यातील अर्धवेळ पदावर कार्यरत ग्रंथपाल यांना आता पुर्णवेळ ग्रंथपाल म्हणून रुपांतरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक दिवसांपासूनची ग्रंथपालांची मागणी पुर्ण झाली. या निर्णयाचा लाभ राज्यभरातील १ हजार २७६ इतक्या ग्रंथपालांना होणार आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.