स्वातंत्र्य दिनानिमित्त आडस येथे रक्तदान शिबीर; ४६ दात्यांचे रक्तदान
लोकगर्जना न्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस येथील सर्वोदय सेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोमवारी ( दि. १५ ) रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ४६ दात्यांनी रक्तदान केले.
अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील रक्त पेढीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे सर्वोदय प्रतिष्ठानचे सागर ठाकुर यांना समजलं त्यांनी ( दि. १५ ) ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षाचे औचित्य साधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित केले. सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबीर पार पडला. या शिबिरास आडस व परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तब्बल ४६ जणांनी रक्तदान केले. रक्त दात्यांना यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने एक वृक्ष भेट देऊन गौरविण्यात आले. यामुळे रक्तदानातून प्राण वाचले जातील व वृक्ष लागवडीतून पर्यावरणाचे संवर्धन होईल, या उपक्रमामुळे सागर ठाकुर यांचे कौतुक करण्यात येत आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी अंबाजोगाई स्वाराती रुग्णालय रक्त पेढीचे डॉ. संतोष कसारे, डॉ. मोरे परमेश्वर, डॉ.वाल्मिक कांबळे, डॉ. सायमा खानम, आडसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा केकाण यांनी परिश्रम घेतले. यांना आडस येथील तरुणांनी सहकार्य केले.