कर्मचारी संपावर सामान्य जनतेची कामे खोळंबली ( Government Employees Strike )

लोकगर्जनान्यूज
केज : जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी येथील विविध विभागाचे कर्मचारी हे संपावर ( Government Employees Strike ) गेले आहेत. यामुळे कार्यालय ओस पडले आहेत. याचा परिणाम सामान्य जनतेवर झालं असून अनेकांना मोकळ्या हाताने परत जावं लागलं. कामे खोळंबली आहेत.
महसूल विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, पंचायत समिती, शिक्षण विभाग, नगर पंचायत , वन विभाग सह आदि कर्मचारी आज मंगळवार ( दि. १४ ) पासून जुनी पेन्शन लागू करा या प्रमुख मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. दिवसभर सर्वच कार्यालय कर्मचाऱ्यांविना ओस पडलेली दिसून आली. याचा फटका सामान्य माणसाला बसत असून अनेकजण आपल्या कामासाठी तहसील, पंचायत समिती सह आदि कार्यालयात आले. परंतु कर्मचारीच नसल्याने त्यांची कामे झाली नाहीत. त्यांना आले तसं रिकाम्या हाताने परत जावं लागलं आहे. आरोग्य सेवाही ढेपाळली असून कोविड काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोलावून रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला. संपातील सहभागी कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय, नगर पंचायत येथे निदर्शने केली. घोषणा देत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली.