आपला जिल्हा
स्लॅब कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू
बीड : कमानीचे काम सुरू असताना स्लॅब अंगावर कोसळून त्याखाली दबल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन भागात आज सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.
शेख इम्रान शेख मुख्तार (वय २२ वर्ष ) रा. इस्लामपुरा हा तरुण भक्ती कन्स्ट्रक्शन भागात पिंपरगव्हाण रस्त्यावरील कमानीचे स्लॅब टाकण्याचं काम सुरू होते.अचानक कमानीचा स्लॅब कोसळला. लाकड, लोखंडी प्लेट व खडी,वाळू, सिमेंट मिश्रीत स्लॅबचे मटेरियल अंगावर पडून त्याखाली दबल्याने मजुर इम्रान गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित सहकारी व नागरिकांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे जाताच तपासून डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.