क्राईम
साळेगाव जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वार शेतकरी गंभीर जखमी
केज : तालुक्यातील साळेगाव जवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने देऊन पळून गेला. यामध्ये दुचाकीवरील शेतकऱ्याच्या पायाला मार लागून गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
मंगळवारी ( दि.१९ ) सायंकाळी कळंब तालुक्यातील आंदोरा (मस्सा) येथील रामदास तांबारे हे शेतकरी केज येथून बटाट्याचे बेणे दुचाकी क्रं. एम.एच. १२ बी.झेड २५३२ वरून घेऊन जात होते. दरम्यान ते केज-कळंब महामार्गावर साळेगाव जशळ दुचाकीला अज्ञान वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रामदास तांबारे यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. ते जखमी अवस्थेत रस्त्यावर वेदनेने तडफडत होते. यावेळी मदत करण्या ऐवजी कोणीतरी लाथा मारल्याचे सांगितले जात असून हे खरं असेलतर अशा व्यक्तीला शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.