क्राईम

लोखंडी सावरगाव जवळ कार पलटली

लोकगर्जनान्यूज

अंबाजोगाई : अंबाजोगाई केज रस्त्यावर लोखंडी सावरगाव जवळ ब्रेझा कार पलटी होऊन घडलेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण जखमी झाल्याची घटना पहाटे 4 च्या सुमारास घडली. यातील दोघे गंभीर जखमी असून सर्वांना उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पुणे येथून एक कुटुंब ब्रेझा कारने क्र. MH 12 5999 अहमदपूर ( जि. लातूर ) येथे लग्नासाठी जात होते. दरम्यान त्यांची कार लोखंडी सावरगाव जवळ लातूर, अंबाजोगाई कडे जाणाऱ्या चौकात आली असता काही अंतरावर कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. या अपघातात आनंद भिंगेवाड ( वय 53 वर्ष ), अरुणा भिंगेवाड, कौशा भिंगेवाड, शाहू उल्लेवाड, आदित्य उल्लेवाड, मीरा भिंगेवाड हे सहाजण जखमी झाले. यातील दोघे गंभीर जखमी असून चौघे किरकोळ जखमी आहेत. 108 रुग्ण वाहिकेने त्यांना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
येथेच वाहन पलटी का होतात?
लोखंडी सावरगाव फाटा ते आडस फाटा या दरम्यान चार चाकी वाहने पलटी होण्याचे प्रमाण वाढलं आहे. मागील काही महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. नेमका येथे रस्त्यात काही दोष आहे की, लोखंडी सावरगाव फाटा येथून एक रस्ता लातूर, अंबा साखर, एक केज तर तिसरा अंबाजोगाई असा जातो. हा त्रिकोण येण्यापूर्वी अंबाजोगाई,केज कडून येणाऱ्या वाहनांसाठी दिशादर्शक फलक नसल्याने नेमकं कोणत्या रस्त्याने जायचे याचा चालकाला समज नाही. अन् तो चाचपडत असल्याने अशा घटना घडत आहेत. याबाबत संबंधितांनी खुलासा करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »