लाच मागितल्या प्रकरणी पीएसआयवर एसीबीची कारवाई

बीड : एका गुन्ह्यात आरोपींना सहकार्य करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली परंतु ४० हजार ठरले. एसीबी च्या चौकशीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे बीड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पठाण अफरोज तैमुरखां असे लाच मागितल्याचे अरोप असलेल्याचे नाव असून, ते पाटोदा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. लुटीच्या दाखल असलेल्या आरोपीला गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी ५० हजार लाचेची मागणी केली. ४० हजार घेण्याचे ठरले होते. हे प्रकरण बीड एसीबी कडे गेले असता त्यांच्या चौकशीत व पंचा समक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाच मागितल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली.पठाण याची पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती ही झाली असून आनंदात होते. परंतु या घटनेने त्या आनंदावर विरजण पडले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.