रात्री झालेल्या भीषण अपघातातील तिन्ही मयतांची ओळख पटली
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : बुधवारी ( दि. २१ ) रात्री घडलेल्या कार व ऊसाच्या ट्रॅलीच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई-लातूर या मृत्यू महामार्गावर घडली आहे. या अपघातातील तिन्ही मयतांची ओळख पटली आहे.
अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील बर्दापूर फाटा येथे नियम अपघात घडतात. बुधवारी रात्री ९:३० च्या सुमारास ऊसाच्या ट्रॅलीला रिफ्लेक्टर नसल्याने कार चालकाला ट्रॅली दिसली नाही. भरधाव कार क्र. एम.एच. ४४ यू ०६४७ ही ट्रॅलीच्या खाली घुसल्याने भीषण अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की, कारचा समोरुन चेंदामेंदा झाला आहे तर कारमधील नंदू माणिक राठोड ( वय ३३ वर्ष ) रा. बिटरगाव ( ता. रेणापूर जि. लातूर ), राहुल सुधाकर मुंडे ( वय ३१ वर्ष ) रा. वंजारवाडी ( ता. रेणापूर ) , बबन प्रभू राठोड ( वय ४५ वर्ष ) रा. बिटरगाव ( ता. रेणापूर ) या तिघांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. याच रस्त्यावर पोखरी फाटा येथे ही दुसरा एक अपघात घडला यामध्ये ५ जण जखमी आहेत. लातूर ते लोखंडी सावरगाव असा हा रस्ता आहे. लातूर जिल्हा हद्दीत हा रस्ता चार पदरी असून बीड जिल्हा हद्द सुरू झाली की, दोन पदरी रस्ता आहे. यामुळे येथे अपघातांची मालिका सुरू आहे. वाढते अपघात आणि मृत्यू पहाता हा मृत्यू महामार्ग असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.