रमेशराव आडसकर यांचा वाढदिवसानिमित्त खोडस येथे बुधवारी कबीर महाराजांचे किर्तन
लोकगर्जनान्यूज
धारुर : तालुक्यातील खोडस येथे बुधवारी ( दि. ३१ ) सायंकाळी किर्तनाचे आयोजन करण्यात आले. या किर्तनाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले.
शेतकऱ्यांचा आधार सर्वसमावेशक माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते रमेश आडसकर यांचा १ जून वाढदिवस असतो.या निमित्ताने वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला जनसामान्यांच्या नेतृत्वाच्या मांगल्यासाठी खोडस ( ता.धारुर ) येथे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हनुमान मंदिरासमोर ह.भ.प. कबीर महाराज ( सातारा ) यांचे सायंकाळी ७ वाजता किर्तन आयोजन केले. या किर्तनाचा आडस,वाघोली, कोळपिंपरी, मानेवाडी, रुई धारुर, आसरडोह, केकाणवाडी सह आदि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच रामधन लाखे, हनुमंत कोकाटे, चेअरमन सुग्रीव गव्हाणे, वचिष्ठ लाखे सह आदी ग्रामस्थांनी केले.