सहा वाहनांचा विचीत्र अपघात; चार जण जागीच ठार

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सहा वाहनांच्या विचीत्र अपघाताची घटना घडली. दोन वाहनांचा मध्ये स्विफ्ट कार अडकल्याने चेंदामेंदा होऊन आतील चार जणांचा मृत्यू झाला. आठ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, मदत पथक यांनी धाव घेत जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल केले. अपघात ग्रस्त वाहने रस्त्यावरुन हटवून वाहतूक सुरळीत केली.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोलीजवळ घाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एका कंटेनरचा ब्रेक फेल झाले. यानंतर कंटेनर समोर चालत असलेल्या स्विफ्ट कारवर आदळले तर कार समोरील टेम्पोवर आदळली असे एकूण सहा वाहनांचा विचीत्र अपघात झाला. कंटेनर व टेम्पो या दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये कार अडकल्याने चेंदामेंदा झाली आतील चार प्रावासी जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. गौरव खरात (वय ३६ वर्ष ), सौरभ तुळसे (वय ३२ वर्ष ), सिद्धार्थ राजगुरू (वय ३१ वर्ष ) अशी मयताचे नावं असून एकाची अद्याप ओळख पटलेली नाही.तसेच या अपघातामध्ये आठ जण जखमी असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणेने घटनास्थळाकडे धाव घेत अपघात ग्रस्तांना मदत केली. जखमींना तातडीने जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. जखमीतील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने सांगितले जात आहे. अपघातानंतर काही वेळ द्रुतगती मार्ग बंद असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली.