मित्रांनो काळजी घ्या! ज्योत आणण्यासाठी गेलेल्या बीड जिल्ह्यातील दोघांचा अपघाती मृत्यू
लोकगर्जना न्यूज
बीड : आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील काही तरुण देवीची ज्योत आणण्यासाठी गेले जाताना येरमाळा येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने सांगवी पाटण गावावर शोककळा पसरली आहे.
सोमवारी घटस्थापना होणार असल्याने गावागावांतून तरुण देवीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूर येथे जातात. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील काही तरुण ज्योत आणण्यासाठी तुळजापूर येथे गेले होते. दरम्यान येरमाळ्या जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अमोल सुरेशराव खिल्लारे ( वय ३५ वर्ष ), महेश भास्करराव भोसले ( ३० वर्ष ) या तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खिल्लारे हे उपसरपंच तर भोसले आरोग्य सेवक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती गावात मिळताच गावावर शोककळा पसरली आहे. दोन तरुण गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातांच्या वाढत्या घटना पहाता तरुणांनो काळजी घ्या असा सल्ला जेष्ठ मंडळींकडून देण्यात येत आहे.