केंद्र शासन पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या विचारात? केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या विधानानंतर चर्चा सुरू

लोकगर्जना न्यूज
केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात जवळपास वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर स्वतः पंतप्रधानांनी हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आंदोलनही संपले शेतकरी आपापल्या घरी परतले. परंतु केंद्र पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या विचारात आहे का? अशी चर्चा केंद्रीय कृषिमंत्री यांच्या विधानामुळे सुरू झाली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर नागपूर मधील एका कार्यक्रमात कृषी कायदे रद्द होण्यासाठी काही लोक जबाबदार आहेत. हे तीनही कृषी कायदे पुन्हा नव्याने आणले जाऊ शकतात. याबाबत सरकार निराश नाही. शेतकरी भारताचा कणा आहेत त्यामुळे आम्ही एक पाऊल मागे घेतलं असून, पुढे देखील टाकू, शकतो. असे सुचक विधान केल्याने केंद्र शासन पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या विचारात आहे का? असा प्रश्न चर्चिला जातो आहे.