क्राईम

महावितरणच्या लाचखोर वरिष्ठ तंत्रज्ञाला एसीबीचा शॉक

लोकगर्जनान्यूज

बीड : जाळालेले विद्युत मिटर बदलून देण्यासाठी व यानंतर वीजबिल जास्त येऊ न देण्यासा महा वितरणाच्या वरिष्ठ तंत्रज्ञासाठी लाच स्वीकारताना खाजगी इसमाला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ व खाजगी इसम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील सापळा आज शुक्रवारी ( दि. ६ ) दुपारी परळी येथे यशस्वी झाला.

तक्रारदाराने सासऱ्यांच्या नावावर असलेले घरगुती विद्युत मिटर जळाल्याने ते बदलून द्यावे म्हणून महावितरणकडे रितसर अर्ज केला. हा जळालेला मिटर बदलून देण्यासाठी तसेच यापुढे येणारं वीजबिल कमी येण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ याने २० हजार रुपये लाच मागितली होती. याप्रकरणी एसीबी कडे तक्रार दाखल केल्याने आज शुक्रवारी ( दि. ६ ) सापळा लावण्यात आला. यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञासाठी पंच समक्ष लाच स्वीकारताना खाजगी इसमाला एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लाचखोर विशाल ज्ञानोबा नागरगोजे ( वय २९ वर्ष ) पद वरिष्ठ तंत्रज्ञ शहर पथक क्र. १ महावितरण कंपनी, परळी ( जि. बीड ) , खाजगी इसम वृक्षराज लक्ष्मण काळे ( वय ३५ वर्ष ) रा. टोकवाडी ( ता. परळी ) या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा बीड एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अमोल धस, रविंद्र परदेशी, कर्मचारी श्रीराम गीराम, भारत गारदे, अविनाश गवळी, वाहन चालक गणेश म्हेत्रे यांनी यशस्वी केला. एसीबीची कारवाई झाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ माजली असून, बीड जिल्ह्यातील वाढती लाचखोरी चिंता निर्माण करणारी ठरत आहे. मागील डिसेंबर महिन्यातच औष्णिक विद्युत केंद्रात एसीबीने कारवाई केली आहे त्यानंतर ही कारवाई झाल्याने परळी शहरात खळबळ माजली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »