महाराष्ट्र पोलीस maharashtra police दलात खळबळ!
पोलीस अधिकाऱ्याने पत्नी व पुतण्याची हत्या करुन स्वतः केली आत्महत्या
लोकगर्जनान्यूज
पुणे : सहाय्यक पोलीस आयुक्त असलेल्या अधिकाऱ्याने पत्नी व पुतण्याला गोळी मारुन हत्या केली तर स्वतः ही गोळी मारुन घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी ( दि. २४ ) पहाटे बालेवाडी पुणे येथे उघडकीस आली. या घटनेने महाराष्ट्र पोलीस ( maharashtra police ) दलात खळबळ उडाली आहे. या घटने मागील कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस तपास करत आहेत.
भरत गायकवाड असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते अमरावती राजपेठ विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांचे कुटुंब बालेवाडी ( पुणे ) येथे रहात असे. ते सुट्टीवर पुणे येथे आले होते. यावेळी त्यांनी स्वतः च्या परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळ्या झाडून मोनी गायकवाड ( पत्नी ), दीपक गायकवाड ( पुतण्या ) या दोघांची हत्या केली. यानंतर स्वतः ही गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. उच्च पदस्थ अधिकाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजताच महाराष्ट्र पोलीस ( maharashtra police ) दलात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते पुढील तपास करीत आहेत. यानंतर यामागील खरे कारण स्पष्ट होईल.