विज कोसळून दाम्पत्य जखमी:केज तालुक्यातील घटना

लोकगर्जना न्यूज
केज : शेतात काम करताना अचानक पाऊस आल्याने पती-पत्नी शेतातील रानुबा मंदिरात बसले. यावेळी मंदिरावर विज कोसळली असून यामध्ये दोघेही जखमी झाल्याची घटना कोरोगाव ( ता. केज ) येथे आज रविवारी ( दि. ९ ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
बळीराम गोवर्धन तांदळे आणि अनिता बळीराम तांदळे रा. कोरोगाव ( ता. केज ) असे जखमी दाम्पत्याचे नावं आहेत. ते रविवारी ( दि. ९ ) शेरी शिवारात सोयाबीन काढणीचे काम करत असताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस आला. पाऊस आल्याने काम थांबवून पती-पत्नी बाजुलाच असलेल्या रानुबा मंदिरात थांबले. यावेळी मंदिरावर विज कोसळली. विजेचा धक्का लागून दोघं जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची तालुका प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.