भवताली
मन्यारवाडी येथे आरोग्य शिबिराला प्रतिसाद
पिंपळनेर / : बीड तालुक्यातील मन्यारवाडी येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसा निमित्त मन्यारवाडी येथ मंगळवारीे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी तपासणी, भव्य रक्तदान व कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या शिबिरास डॉ. आमित काळे, डॉ.सय्यद अब्दुला हसीब, डॉ. प्रदीप सानप, रामेश्वर वाघमारे, प्रसाद ठोसर, राजश्री बावरे, चंद्रभान माने, साहेबराव पोपळे, बंडू पोपळे, गणेश भोंडे, शरद शिंदे, निखिल माने, नारायण मानेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.