क्राईम

चोरट्यांचा धुमाकूळ: एका रात्रीत सात घर फोडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

केज : तालुक्यातील चिंचोली माळी येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल सात घरे फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलीस व श्वान पथक रवाना झाल्याचे वृत्त आहे.

रविवार ( दि. २५ ) मध्यरात्रीच्या दरम्यान चिंचोली माळी ( ता. केज ) येथे
अज्ञात चोरट्यानी घरांचे कुलूप तोडून घरातील फक्रुद्दीन हुसेन शेख यांच्या घरातील दीड तोळ्याचे दागिने, बाळासाहेब उर्फ जयदत्त गलांडे यांच्या घरातून त्यांच्या बहिणीचे दागिने, विकास देशमुख यांच्या घरातून रोख ४ हजार तर दत्ता काळे यांच्या घरातील १० हजार रु. चोरट्यांनी लंपास केले . यांच्या सह दत्ता काळे, सलीम शेख, नागनाथ काळे आणि लिंबराज मगर यांचेही घर फोडण्यात आले. एकाच रात्री सात घरे फोडली असल्याने चिंचोली माळीसह परिसरातील नागरिकांत व वस्त्यांवर घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »