लोकगर्जनान्यूज
बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात बस,ऊसाचे ट्रॅक्टर अन् कार असे तीन वाहनांचा भीषण अपघात घडला यामध्ये जागीच 6 प्रवासी ठार झाले असून अनेकजण जखमी आहेत. सदरील अपघात मंगळवारी ( दि. 23 ) मध्यरात्री अडीचच्या सुमारास अहमदनगर-कल्याण महामार्गावर घडला आहे. रात्रीच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना पारनेर, अहमदनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे-मेहकर बस व ऊसाचा ट्रॅक्टर अन् इको कार असा तीन वाहनांचा अपघात ढवळापूर ( जि. अहमदनगर ) फाट्याजवळ घडला आहे. हा अपघात इतका भीषण आहे की, अपघातग्रस्त तीन्ही वाहने चक्काचूर झाली असून सहा प्रवासी जागीच ठार झाले. अनेकजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अहमदनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करत पारनेर व अहमदनगर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तीन वाहनांचा अपघात घडल्याने हा रस्ता पुर्णपणे बंद झाला होता. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. परंतु पोलीस प्रशासनाने रात्रीच वाहने बाजुला काढून वाहतूक सुरळीत केली. यातील मयतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यामुळे नावे समजु शकली नाहीत.