कृषी

बीड जिल्ह्यातील या अभियंतावर ( Engineer ) ही वेळ कोणी आणली? जिल्हाधिकांऱ्यांकडे मागीतली गांजा लागवडीची परवानगी

लोकगर्जनान्यूज

बीड : कृषी अभियंता असलेल्या बेरोजगार तरुण शेतकऱ्याने सोयाबीन, कापूस या पिकांना योग्य दर मिळत नाही. तसेच ऊस गाळपासाठी कारखान्याचे नियोजन नाही. हे पहाता शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे बहुउपयोगी गांजा लागवडीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे परवानगी देण्याची मागणी केली. ही मागणी पुढं येताच बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सुशिक्षित असलेल्या कृषी अभियंता ( Agricultural Engineer ) यांच्यावर ही वेळ कोणी आणली? असा संतप्त प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. मायबाप सरकारने याचे उत्तर द्यावं अशी मागणी केली जात आहे.

बीड जिल्ह्यातील कृषी अभियंता ( Agricultural Engineer ) असलेलं सुशिक्षित बेरोजगार तरुण शुभम भास्कर माने रा. वाघीरा ( ता. माजलगाव ) यांनी ( दि. ३० ) सोमवारी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिले. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी वाघीरा ( ता. माजलगाव ) येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे. आपल्या जिल्ह्यात सध्या सोयाबीन, कापूस, तूर आदी पारंपरिक पिकांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे ही पिकं घेण्यास परवडत नाही. ऊस लागवड करावी तर पाण्याचा प्रश्न आहे. गतवर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला. यावर्षी माजलगाव तालुक्यात गेल्या वर्षी सारखेच चित्र दिसत आहे. २०२२ वर्षातील नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात लागवड केलेले ऊस सध्याही शेतात उभे आहे. तोड मिळत नसल्याने वजन घटत चालले आहे. यामुळे ऊस ही परवडत नाही. याचा विचार केलातर साखर कारखान्यांकडे काही नियोजन आहे की, नाही ? असा प्रश्न पडतो आहे. यामुळे शेती नुकसानीत असून शेतकरी देशोधडीला लागला आहे. उद्योग धंदे ही बीड जिल्ह्यात नाहीत तर, शेती परवडत नाही. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढायचं असेलतर मा. जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. हे निवेदन एक निमित्त असले तरी यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दैनीय अवस्था दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »