क्राईम
बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार
लोकगर्जनान्यूज
बीड : अल्पवयीन मुलीला एका खोलीवर घेऊन जाऊन दोघा नराधमांनी आत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन्ही नराधमां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाणे हद्दीतील एक मुलगी बुधवारी ( दि. २७ ) सायंकाळी किराणा दुकानातून बिस्कीट नेहण्यासाठी आली. यावेळी दोघांनी तिला दुचाकीवर बसवून एका खोलीवर घेऊन गेले. येथे तिच्यावर दोघांनी आत्याचार केले. तिने हा प्रकार घरी परत आल्यानंतर वडीलांना सांगितला. वडीलांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरुन आरोपी कृष्णा आरे व अन्य एक अनोळखी असे दोघांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.