धक्कादायक! अंध महिलेच्या तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार; संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यात

लोकगर्जनान्यूज
बीड : खाऊचे आमिष दाखवून एकानं अवघ्या तीन वर्षाच्या मुलीला स्वच्छता गृह परिसरात नेऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस येताच बीड जिल्हा सुन्न झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पहाटे पर्यंत तळ ठोकून होते. तसेच याप्रकरणी एका संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन असल्याचे वृत्त आहे.
बीड शहरात एक अंध महिला भिक्षा मागून आपली गुजराण करते. या महिलेच्या तीन वर्षांच्या मुलीला मंगळवारी ( दि. २१ ) रात्री १० च्या सुमारास एका अनोळखी नराधमाने खाऊचे आमिष दाखवून बसस्थानका समोरील स्काऊट गाईड कार्यालयाच्या पाठी मागे असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृह परिसरात नेऊन लैंगिक आत्याचार केले. यामुळे मुलगी मोठ्याने ओरडत होती. हा आवाज ऐकून काहींनी त्या दिशेने धाव घेतली. काहीजण आपल्याकडे येत असल्याचे पाहून आरोपीने पळ काढला. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. महिती मिळताच पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपाधिक्षक, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. हे सर्व अधिकार हे पहाटे पर्यंत घटनास्थळी ठाण मांडून होते. तपास सुरू करुन बीड पोलीसांनी पहाटे एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेने बीड जिल्हा सुन्न झाला.