पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर; राज्यात या तारखे पासून पोलीस भरती प्रक्रिया?

लोकगर्जना न्यूज
राज्यात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी १५ जून पासून प्रक्रियेला प्रत्येक्षात सुरुवात होईल. विविध पदांसाठी ७ हजार जागा भरण्यात येतील. तसेच पोलीस दलातील मनुष्यबळाची गरज पहाता १५ हजार पदे भरण्यात येणार असून यास मंत्रिमंडळाची परवानगी मिळाली की, त्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात केले.
पोलीस भरती होणार असल्याचे बऱ्याच दिवसांपासून सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुण जोरदार तयारी करत आहेत. गावा-गावात पहाटे पासून तरुण मेहनत घेताना दिसतात. या तरुणांचं पोलीस, सैन्य भरतीत जाण्याचं स्वप्न आहे. या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून, महाराष्ट्र शासन ७ हजार पोलीसांचे पद भरती करणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे येथे एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. भरती प्रक्रिया येत्या जून महिन्याच्या १५ तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचा पोलीस होण्याचा एक मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात पोलीस दलात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे यंत्रणेवर ताण येतो हा ताण कमी करण्यासाठी राज्यात १५ हजार पोलीस पदांची भरती करण्यात येणार आहे. तशी मागणीही गृहविभागाने केली आहे. यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अनुकूल असून, मंत्रीमंडळाच्या मान्यते नंतर ही पदे भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.