पुतळ्यास अभिवादन करुन आडस येथे साठे जयंती साजरी
लोकगर्जना न्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील पुतळ्याला अभिवादन व लक्ष्मण वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन जयंती साजरी करण्यात आली.
सोमवारी ( दि. १ ) ऑगस्ट सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त साठे नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सेवानिवृत्त मेजर बालासाहेब शेप यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच दलित चळवळीला वाहून घेतलेले लक्ष्मण वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लक्ष्मण वाघमारे, शिवरुद्र आकुसकर यांनी आपल्या वाणीतून अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. यावेळी सागरसिंह ठाकुर, सविता आकुसकर, नितीन ठाकुर, गोरख गायकवाड, पत्रकार रामदास साबळे, शेख इसाक, गोविंद पाटील, अशोक तोडकर ( ग्रामविकास अधिकारी), गोविंद वाघमारे, राहुल शिंदे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.