धारुर तालुक्यात पुन्हा जिल्हा परिषद शिक्षकाची आत्महत्या
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : तालुक्यातील आसरडोह येथील एका जिल्हा परिषद शिक्षकांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार ( दि. ५ ) दुपारी ४ वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, पो. कॉ. सिध्देश्वर सचिन यांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठविला आहे.
चंद्रकांत लक्ष्मण सुरवसे ( वय ४३ वर्ष ) रा. आसरडोह ( ता. धारुर ) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते आसोला ( ता. धारुर ) येथे जिल्हा परिषद शाळेवर ज्ञानदानाचे कर्तव्य बजावत होते. आज बुधवार ( दि. ५ ) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आसरडोह येथे मोरफळी साठवण तलावाजवळ त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती आडस पोलीस चौकीला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव,. पो.कॉ. सिध्देश्वर सचिन यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिनाभरात दोन शिक्षकांनी गावातच आपलं आयुष्य संपवल्याने आसरडोह येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.