खळबळजनक!भाजपा कार्यकर्त्याचा हत्या;बीड जिल्ह्यातील घटना
अनैतिक संबंधातून घटना घडल्याची चर्चा

लोकगर्जनान्यूज
बीड : भररस्त्यात कोयत्याने वार करुन भाजपा कार्यकर्त्याची हत्या झाल्याची घटना माजलगाव शहरात आज मंगळवारी (दि.१५) दुपारी घडली आहे. या हत्येमागे अनैतिक संबंधाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. तर हत्या करणारा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेने माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे.
बाबासाहेब आगे असे मयत भाजपा कार्यकर्त्याचे नाव असून, दुपारी माजलगाव शहरातील शाहूनगर भागातील भाजपा कार्यालयाला लागून आरोपीने भरदुपारी रस्त्यावरच कोयत्याने हल्ला केला. यामध्ये भाजपा कार्यकर्ता आगे जागीच ठार झाला. या घटनेची गंभीर दखल घेत माजलगाव पोलिसांनी संशयित आरोपी नारायण फपाळ यास ताब्यात घेतले आहे. बीड जिल्हा मागील काही महिन्यांपासून सततच चर्चेत असून जिल्ह्यातील गंभीर घटना थांबण्याचे नाव घेत नाही. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.