दोघींचा विनयभंग; केज तालुक्यातील घटना
केज : तालुक्यातील दोन विनयभंगाच्या घटना समोर आल्या असून, वेगवेगळ्या गावातील महिला आपल्या घरात असताना घरात घुसून हा प्रकार घडला आहे. मागील काही दिवसांपासून या घटना वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
केज पोलीस ठाणे हद्दीतील हे दोन्ही गाव असून ( दि. १४ ) सोमवारी विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरील पिडीत महिला या आपल्या घरामध्ये एकट्याच होत्या याचा फायदा घेत या नराधमांनी घरात घुसून महिलांचा विनयभंग केला. याप्रकरणी दोन्ही महिलांच्या वेगवेगळ्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास बाळराजे सोनवणे व धनपाल लोखंडे हे करीत आहेत. मागील काही दिवसांपासून केज तालुक्यात छेडछाड, विनयभंग या घटना वाढलेल्या दिसत असून यांना रोखण्यासाठी कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.