दर घसरले: सोयाबीन साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास!
लोकगर्जना न्यूज
बीड : सोयाबीनचे दर वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे. परंतु दर घसरले असून सहा हजारांचा आत आले. त्यामुळे भ्रमनिरास झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक कापूस उत्पादन घेतले जायचे पण काही व ताऱ्यांच्या चुका, बीटी बियाणे असूनही बोंब अळी, लाल्या सह विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे कापसाचे उत्पादन घटले अन् खर्च निघणं मुश्किल झाले. याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली. गत वर्षीतर कमाल झाली सोयाबीन तब्बल ११ हजार रुपयांहून अधिक प्रतिक्विंटल दर गाठलं. यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली. दोन वर्षांपासून खरीप हंगामातील सोयाबीन प्रमुख पीक ठरले आहे. ११ हजार रुपये दर पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीन पीकाला पसंती दिली खरी परंतु शेतकऱ्यांच्या पदरात पीक पडताच भाव गडगडले आणि ११ हजारावरुन चक्क ८ हजारांपर्यंत दर आले. यानंतर घसरण सुरू राहीली व दर ७ हजारांपर्यंत खाली आले. ज्यांना नड आहे अशा शेतकऱ्यांनी मीळेल त्या दराने सोयाबीन विकून नड भागविली, काही देणं पाणी सारलं. परंतु अनेक मोठ्या शेतकऱ्यांनी दर वाढतील या आशेने साठवणूक केली. एक दाणाही विकला नाही. परंतु मागील काही दिवसांपासून दर घसरण सुरूच आहे. आज गुरुवारी तर लातूर एडीएमचा ६ हजार ३० रु. दर होता.हा यावर्षीचा सर्वात कमी भाव आहे. अनेक ठिकाणी व्यापारी ५ हजार ८०० रु. प्रमाणे खरेदी करत आहेत. जास्त दर मिळण्याची आशा फोल ठरली असल्याने भ्रमनिरास झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.