शिक्षण संस्कृती
डिघोळ अंबा प्रशालेत महापरिनिर्वाण दिन साजरा

अंबाजोगाई : तालुक्यातील जि.प. माध्यमिक शाळा डिघोळ अंबा प्रशालेत दि. 6 डिसेंबर 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा केला.
शाळेचे मुख्याध्यापक जोगदंड बालासाहेब यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी म्हेत्रे एस.बी, कवडे सी.एन., आडे आर. एल, सांस्कृतिक विभाग प्रमुख शेख सिराज, चव्हान विक्रम, निर्मळे एम.एन., चव्हान, वांजरखेडकर आदि उपस्थित होते. संचालन शेख सिराज यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जोगदंड बी.वाय. ,शेख सिराज, कवडे सी.एन. यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.शाळेतील शिक्षकवृंद , सर्व विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी आदि उपस्थित होते.