ज्याची भीती तेचं घडलं देशात ओमिक्रॉनचा शिरकाव
बंगळुरु दि.2 – शेवटी देशात ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (two patients of omicron corona new variant found in karnataka information given by central health ministry)
66 आणि 46 वर्षांचे हे दोन रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. काल पर्यंत एकही रुग्ण भारतात नसल्याचे सांगण्यात येत होते मात्र भारताची चिंता वाढली असून कोरोनाच्या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.परंतु कित्येकजण दुर्लक्ष करत असल्याने धोका वाढला आहे.
दरम्यान सर्वच राज्यांनी खबरदारीच्या उपाययोजना घेण्याच्या सूचनाही केंद्राने केल्या असून कोरोनाचे निर्बंध वाढण्याची शक्यता आहे.