भवताली

विद्यार्थ्यांनी कायदयाचे पालन करावे – न्यायाधीश एस. व्ही. पावसकर

केज येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर

लोकगर्जनान्यूज

केज : शहरातील सरस्वती महाविद्यालयात तालुका विधीसेवा समिती केज व विधिज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीर शनिवार ( दि. 12 ) घेण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक केज दिवाणी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. व्ही. पावसकर, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश ए. टी. जगताप उपस्थित होते.

केज वकील संघाचे अध्यक्ष एम. एस. लाड,
सहायक गटविकास अधिकारी सविता शेप,पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,गटशिक्षणाधिकारी कमलाकर खरात, विस्तार अधिकारी सुनील केंद्रे, प्राचार्य डॉ जी. बी. पाटील,डॉ हनुमंत सौदागर, मुख्याध्यापक धनराज सोनवणे,मुख्याध्यापक सविता घुले ,सहा
सरकारी वकील ॲड डी. आर. घुले, प्रास्तविक ॲड. डी. टी. सपाटे,ॲड एल. व्ही. गायकवाड ,ॲड.एस.व्ही. मिसळे,मार्गदर्शन करताना लाड म्हणाले विद्यार्थ्यांनी व्यसन करू नये. अभ्यास करून चांगले यश प्राप्त करावे उपलब्ध सुविधांचा योग्य वापर करून योग्य दिशेने वाटचाल करावी असे मत व्यक्त केले. गायकवाड यांनी युवकांनी योग्य संधीचा उपयोग करून घ्यावा असे मत व्यक्त केले. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी गाड्या चालवत असताना नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे मत व्यक्त केले.

न्या पावसकर यांनी रॅगिंग कायदेविषयक माहिती देताना रॅगिंग ची गोपनीय माहिती देऊ शकता असे आवाहन केले.
रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला अपराध सिद्धतेनंतर महाविद्यालयातून काढून टाकण्याची तरतूद आहे.
कलम 5 नुसार विद्यार्थ्याला
कोणत्याही शिक्षण संस्थेत पाच वर्षे प्रवेश दिला जात नाही. रॅगिंग मधून विद्यार्थ्यांनी इतरांचा छळ करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
न्यायिक अधिकारी व वकील संघाच्या सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना माहितीपत्रक देण्यात आले. श्री सुसंगे व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ॲड सपाटे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. एस. व्ही. मिसळे यांनी तर आभार डॉ नागेश कराळे यांनी मानले.
कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
शिबिर यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे आय. क्यू. सी. समन्वयक प्रा. डॉ. वैशाली आहेर ,सांस्कृतिक विभाग प्रा. किरणकुमार धीमधीमे व वकील संघ यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »