आपला जिल्हाशिक्षण संस्कृती

जि.प.चे 52 शिक्षक निलंबित; बोगस अपंगांना सीईओंचा दणका

लोकगर्जनान्यूज

बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांनी स्वतःसह कुटुंबातील सदस्यांचे अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र काढल्याचे प्रकरण समोर आले. याची दखल घेत या सर्वांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सदरील प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर येताच सीईओ अजित पवार यांनी ५२ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे शिक्षकात खळबळ माजली असून आणखी ८८ जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या ५२ शिक्षकांवर विभागीय कारवाई होणार आहे.

मर्जीच्या ठिकाणाहून बदली होऊ नये म्हणून जिल्हा परिषद शिक्षकांनी लक्ष लढवून स्वतः सह कुटुंबातील सदस्यांचे अपंग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले आहेत. याचा भांडा बीड जिल्हा परीषदेतील सन २०२२ प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे जिल्ह्यांतर्गत बदली संदर्भात संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्यामुळे झाला. तसेच याप्रकरणी तक्रार करण्यात आली. याची दखल घेऊन सीईओ अजित पवार यांनी ३३६ शिक्षकांची सुनावणी घेतली. त्यापैकी २३६ शिक्षकांची अंबाजोगाई येथील स्वमी रामानंद तीर्थ रूग्णालयमध्ये पुनर्रतपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल ५२ दिव्यांग शिक्षक बोगस आढळून आले. यानंतर सोमवार ( दि. २३ ) सीईओ अजित पवार यांनी त्या शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आणखी ८८ शिक्षकांचा अहवाल मागे असून यामध्ये आणखी किती शिक्षक बोगस निघतात. याकडे लक्ष लागले आहे. सध्या कारवाई करण्यात आलेले शिक्षक खालील प्रमाणे आहेत.

  1. धनंजय गोविंदराव फड अंबाजोगाई अल्पदृष्टी
  2. रविकांत सुधाकर खेपकर अंबाजोगाई अस्थिव्यंग
  3. अशोक वामनराव यादव अंबाजोगाई अस्थिव्यंग
  4. चिंतामण तुकाराम मुंडे अंबाजोगाई अस्थिव्यंग
  5. राजू शंकर काळे आष्टी (मुलगी दिशा राजू काळे कर्णबधीर
  6. वर्षा रामकिसन पोकळे आष्टी कर्णबधीर
  7. राजेंद्र शिवाजी हजारे आष्टी (पत्नी धोंडे सुषमा लक्ष्मण कर्णबधीर
  8. अमोल कुंडलीक शिंदे आष्टी अल्पदृष्टी
  9. आनंद सिताराम थोरवे आष्टी अस्थिव्यंग
  10. मनिषा उत्तमराव धोंडे आष्टी (पती हुमे रविंद्र उत्तमराव अस्थिव्यंग
  11. देविदास भानुदास नागरगोजे केज अल्पदृष्टी
  12. आसाराम पांडुरंग चेंडुळे गेवराई अल्पदृष्टी
  13. रमेश ज्ञानोबा गाढे गेवराई अल्पदृष्टी
  14. हनुमान यशवंत सरवदे गेवराई अल्पदृष्टी
  15. सुधाकर दगडू राऊत गेवराई अस्थिव्यंग
  16. अरूण भीमराव चौधरी गेवराई अस्थिव्यंग
  17. महादेव सखाराम जाधव गेवराई अस्थिव्यंग
  18. मनोजकुमार अशोकराव जोशी गेवराई अस्थिव्यंग
  19. मनोजकुमार मधुकर सावंत गेवराई अस्थिव्यंग
  20. अनिता गोविंदराव यादव गेवराई (पती सावंत मनोजकुमार मधुकर अस्थिव्यंग)
  21. अर्चना भगवान इंगळे धारूर अस्थिव्यंग
  22.  शांताराम भानुदासराव केंद्रे परळी अल्पदृष्टी
  23.  मनोज नरसिंगराव सुर्यवंशी परळी अल्पदृष्टी
  24.  दिपक भालचंद शेप परळी अल्पदृष्टी
  25. ज्ञानदेव नवनाथ मुटकूळे पाटोदा अल्पदृष्टी
  26.  गणेश भागवत ढाकणे पाटोदा अल्पदृष्टी
  27.  पांडुरंग आबासाहेब गवते बीड कर्णबधीर
  28.  शितल शहादेव नागरगोजे बीड कर्णबधीर
  29.  स्वाती चंद्रसेन शिंदे बीड कर्णबधीर
  30.  भारती मुरलीधर गुजर बीड कर्णबधीर
  31.  आंबिका बळीराम बागडे बीड कर्णबधीर
  32.  विमल नामदेव ढगे बीड कर्णबधीर
  33. जीवन रावसाहेब बागलाने बीड कर्णबधीर
  34.  शोभा आंबादास काकडे बीड कर्णबधीर
  35.  वनमाला देविदासराव इप्पर बीड कर्णबधीर
  36.  आश्रुबा विश्वनाथ भोसले बीड अल्पदृष्टी
  37.  राजश्री रघुवीर गावंडे बीड अल्पदृष्टी
  38. वाजेदा तबस्सुम मोहमद शफीउद्दीन बीड अल्पदृष्टी
  39. शैला नागनाथ शिंदे बीड (मुलगा काटे हर्षवर्धन सतिष अल्पदृष्टी
  40. रतन आंबादास बहीर बीड (पत्नी हातवटे अश्विनी विठ्ठलराव अल्पदृष्टी)
  41. दत्तू लक्ष्मण वारे बीड अस्थिव्यंग
  42.  बंडू किसनराव काळे बीड अस्थिव्यंग
  43.  चांदपाशा महेबूब शेख बीड (पत्नी आयेशा सिध्दीका इनामदार अस्थिव्यंग )
  44. उज्वल्ला अशोक जटाळ (पती भोसले नितीन शत्रुघ्न अस्थिव्यंग )
  45. आयशा सिद्दीक इनामदार बीड अस्थिव्यंग
  46.  ज्योती लहुराव मुळूक बीड अस्थिव्यंग
  47.  अंजली प्रभाकर भोसले बीड (पती काळे बंडू किसनराव अस्थिव्यंग
  48.  गोविंद अशोक वायकर बीड अस्थिव्यंग
  49.  शेख समीना बेगम शेख हमीद बीड (मुलगा दाणी रियाज शेख अस्थिव्यंग )
  50. सुनीता भारत स्वामी बीड (मुलगी स्वामी प्रतिक्षा भारत अल्पदृष्टी)
  51. निवृत्ती रामकिशन बेदरे शिरूर (मुलगा बेदरे चंद्रकांत निवृत्ती अल्पदृष्टी)
  52. बाळू उमाजी सुरासे शिरूर अल्पदृष्टी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »