साळेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिर

केज : तालुक्यातील साळेगाव येथे विश्वावंदनिय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर पार पडला यामध्ये अनेक रक्तदात्यांनी सहभागी होऊन शिबिर यशस्वी केले.
महामानव विश्ववंदनिय भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त साळेगाव ता केज येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहन करून अभिवादन करण्यात आले. तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी गावातील अनेक तरुणांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, माजी सरपंच सय्यद नूर साहेब, नारायण लांडगे, सुभाष गालफाडे, दैवशाला सरवदे, माजी व्हाईस चेरमन संभाजी सरवदे, लिंबाजी बचुटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी, अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे रोशन सरवदे, बाळासाहेब गायसमुद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.